भुसावळ (प्रतिनिधी )-
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे या वर्षी घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रोजेक्टच्या चेअरमन हेमलता सोनार यांना नियुक्त करण्यात आले आहे. आरास परीक्षण समितीत सुनीता पाचपांडे आणि विनीता नेवे यांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या नियमानुसार फक्त भुसावळ शहरातील घरगुती गणपती यासाठी पात्र असतील. आरास घरगुती व पर्यावरणपूरक असावी तसेच मूर्ती मातीची असावी शिवाय अपार्टमेंट किंवा कॉलनीचा गणपती आरास स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र नसून केवळ घरातील गणपती असण्याची अट असून स्पर्धा प्रवेश निशुल्क आहे. आरासचा विडिओ रविवार, २३ पर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत ९२३९८८६८९ या नंबर वर व्हॉटसअॅप करावा शिवाय त्यानंतर पाठवलेला व्हिडिओ विचारात घेतला जाणार नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त एक मिनिटांचा असावा तसेच ऑनलाईन परीक्षण २४ रोजी केले जाणार आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ तीन बक्षीस दिले जातील.बक्षिसाचे स्वरूप आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र असे असणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मोना भंगाळे, सेक्रेटरी रेवती मांडे आणि सदस्यांनी केले आहे.



