भुसावळातीलअमृततुल्यच्या एकच प्याल्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आस्वाद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या एकच प्याला अमृततुल्य टी पॉइंटला स्वातंत्रदिनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट देवून अमृततुल्यच्या स्वादीष्ट चहाचा आस्वाद घेतला.
येथील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी शहरात आठवडे बाजार येथे “एकच प्याला “अमृततुल्य टी पॉइंट ‘ दुकान सुरू केले आहे .दिवसेंदिवस अमृततुल्यची ख्याती शहरात पसरली आहे . पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे १५ ऑगष्ट रोजी भुसावळ येथे आले असता त्यांनी अमृत तुल्य टी पॉइंटला सदिच्छा भेट देवून संजयसिंग यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी आवर्जून रुचकर व वाफाळलेल्या एकच प्याला चहाचा आस्वाद घेतला.
यावेळी पत्रकार संजयसिंग चव्हाण , नितिन जैन , ओमकार चव्हाण यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटिल यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक मनोज बियाणी, राजू पारीख आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथील जाहीर सत्काराच्या कार्यक्रमात शहरातील पत्रकारांसोबतचे ऋणानुबंध व्यक्त केले होते. याप्रसंगी त्यांनी संजयसिंग चव्हाण यांचा उल्लेख केला होता. राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असतांनाही ना. पाटील यांनी जुने मैत्रीपूर्ण संबंध जोपासले व दुकानाला सदिच्छा भेट दिल्याने अत्यानंद झाला . खरच गुलाबभाऊ सामान्यांच्या हृदयात आपला माणूस म्हणून का राहतात हे यावरुन समजले,ही भेट सदैव अविस्मरणीय असल्याच्या आनंदी भावना संजयसिंग यांनी यासंगी व्यक्त केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *