वाणिज्य विभागा तर्फे ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दरवर्षी प्रमाणे वाणिज्य विभागा तर्फ ७४ वा स्वातंत्र्य दिन पार्सल ऑफिस मध्ये साजरा करण्यात आला . यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले . आणि महाप्रबंधक यांचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांना वाचून दाखविण्यात आला .
युवराज पाटील यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७४ वा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी मंडळ वाणिज्य प्रबंधक बी अरुण कुमार , सहायक वाणिज्य प्रबंधक(माल ) अनिल बागले , सहायक वाणिज्य प्रबंधक(टी.जा. ) अनिल कुमार पाठक , मंडळ वाणिज्य निरीशक संजय चापोरकर , मुख्य वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी , सुदर्शन देशपांडे , आर डी क्षीरसागर , शैलेश पारे , प्रकाश ठाकूर , मुख्य पार्सल पर्यवेक्षक हितेंद्र आव्हाड , सर्व वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *