भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे विभागात ७४ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान ठेवत आणि सगळ्या प्रकारची काळजी घेत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला .
विवेक कुमार गुप्ता डी आर एम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच त्यांनी महाप्रबंधक मुबई यांच्या संदेशाचे वाचन करून स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये शैलेश पारे रेल्वे बोर्ड अवॉर्ड, रवी किरण, पी के गुप्ता, योगेश नागरे, एन् व्ही गुहिलोट यांना जी एम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच लॉकडाउनच्या काळात निष्ठापूर्वक कार्य करणाऱ्या 200 कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा हा सन्मान जाहीर करण्यात आला.
एन डी गांगुर्डे सिनि डी पी ओ यांनी विविध विभागांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा केली.
स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमास नीता गुप्ता अध्यक्षा मध्य रेल्वे महिला कल्याण समिती, मनोज कुमार सिन्हा ए डी आर एम, रजनी सिन्हा उपाध्यक्षा मध्य रेल्वे महिला कल्याण समिती तसेच कार्यकारिणी सदस्या मध्य रेल्वे महिला कल्याण समिती ,
रेल्वे अधिकारी, रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा स्वामी मुख्य कल्याण निरीक्षक यांनी केले.



