शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे देवळाली ते दानापूर सुरु


भुसावळ (प्रतिनिधी)-
७ ऑगष्ट पासून भारतीय रेलवे कडून पहिली किसान पार्सल गाड़ी ही सुरु करण्यात आली आहे .शेतकरी बाँधवानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रेलवे प्रशासनाने केले आहे
सदर ही गाड़ी सप्ताह मधून एक दिवस देवळाली ते दानापूर चालवली जाणार आहे . मागणी केल्यास या गाडीच्या फेरी मध्ये वाढ करण्यात येइल . सदर शेतकरी लोकाना त्यांचा माल बुक करण्यासाठी त्याना माल पॅक करून हा आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिस मध्ये घेऊन आणावा लागेल . सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स ठेवावी लागेल .
सदर ही गाड़ी समयसारणी नुसार चालवली जाणार आहे
गाड़ी क्रमांक – 00107 डाउन देवळाली ते दानापूर ही गाड़ी प्रत्येक शुक्रवार रोजी प्रस्थान स्टेशन येथून 11 वाजता प्रस्थान करुण शनिवार रोजी दानापुर ला 18.45 ला पोहचेल
गाड़ी क्रमांक – 00108 अप दानापूर ते देवळाली ही गाड़ी प्रत्येक रविवारी प्रस्थान स्टेशन येथून 12 वाजता प्रस्थान करून सोमवारी 19.45 वाजता देवळाली ला पोहचेल
• किसान पार्सल रेलवे ला नाशिक रोड,- 11.10/11.30 मनमाड,- 12.35/12.55 जळगाव-14.55/15.15, भुसावळ-15.45/16.05, बुऱ्हाणपूर-17.00/17.20, खांडवा-18.40/19.00, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय नगर आणि बक्सर याठिकाणी नियोजीत थांबे देण्यात आले आहेत.
यापूर्वी भारतीय रेल्वेने केळी आणि इतर एकल पदार्थांच्या निर्यातीसाठी विशेष रेल्वे चालवली आहे. मात्र, ही पहिलीच बहुपयोगी गाडी असून ती डाळिंब, केळी, द्राक्षे या फळांसह शिमला मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी, कांदे, मिरच्या या भाज्यांची वाहतूक करणार आहे. स्थानिक शेतकरी, मजूर, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर व्यक्तींच्या सहाय्याने प्रभावी विपणन करण्यात येणार आहे. मागणीची एकत्रित नोंद केली जाईल.
मध्य रेल्वे विभागात भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषीप्रधान विभाग आहे. नाशिक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात ताजा भाजीपाला, फळे, फुले, कांदे आणि इतर कृषी उत्पादने आणि नाशवंत पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. ही उत्पादने प्रामुख्याने पाटणा, प्रयागराज, कटनी, सतना याठिकाणी पाठवले जातात.
प्रमुख स्थानकाचे शुल्क खालीलप्रमाणे आहेतः प्रति टन भाड़े
१) नाशिक रोड/ देवळाली ते दानापूर — रु. 4001 प्रति टन भाड़े
२) मनमाड ते दानापूर — रु. 3849 प्रति टन भाड़े
३) जळगाव ते दानापूर — रु. 3513 प्रति टन भाड़े
४) भुसावळ ते दानापूर — रु. 3459 प्रति टन भाड़े
५) खांडवा ते दानापूर — रु. 3148 प्रति टन भाड़े
या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळून शेतकर्‍यांना मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांकडून ‘पी’ श्रेणीअंतर्गत नियमित पार्सल भाडे आकारण्यात येणार आहे. रेल प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन त्यानी जास्तीत जास्त या गाडीचा उपयोग घ्यावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *