भुसावळ(प्रतिनिधी)-
शहरातील आठवडे बाजार भागात लिलाव ठिकाणी एका
भाजीपाला विक्रेत्यावर दोघांनी भांडण करून चाकू हल्ला केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाजीपाल्याच्या लिलावाच्या कारणावरून दिनांक ९ ऑगष्ट २०२० रोजी रात्री ८ वाजेचे सुमारास पंचशील नगर भागात राहणारे आरोपी धम्मा सुरळकर व रितीक नरेंद्र चौधरी यांनी फिर्यादी पवन मोहन चौधरी वय ३० राहणार श्रीराम नगर यांचे सोबत भांडण करुन पवन चौधरीं यांचे उजव्या हाताच्या दंडावर आरोपी धम्मा सुरळकर याने चाक़ूने वार करून दुखापत केली. याबाबत पवन मोहन चौधरी यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन
गुरुन ७७१/२०२० भाग-५ भा.द.वि कलम ३२४,३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास पोना निलेश बाविस्कर करीत आहे.



