भुसावळात देशी दारूची बेकायदेशीर विक्री,एकास अटक.

भुसावळ (प्रतिनिधी) –
शहरातील जामनेर रस्‍त्‍यावरील कृष्णा नगर समोरील साई डेअरी जवळ एक इसम बेकायदेशीररित्‍या देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्‍याची गुप्‍त माहिती पोलीसांना मिळाली होती.
या गुप्‍त माहितीवरून पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक भाग्‍यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,भुसावळ बाजारपेठचे
पोनि.दिलीप भागवत यांच्‍या मार्गदर्शनाखाली छापा टाकला असता प्रमोद प्रकाश धांडे रा.कृष्‍णा नगर हा बेकायदेशीररित्‍या विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असतांना मिळाल्याने त्‍यास ताब्‍यात घेऊन २ हजार ४९६ रू.किमतीच्‍या ४८ देशी दारूच्‍या भरलेल्‍या बाटल्‍या जप्‍त करण्‍यात आल्‍या.
सदर कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे पोना.निलेश बाविस्कर,रविंद्र बि-हाडे,महेश चौधरी,रमण सुरळकर पोकॉ.कृष्णा देशमुख,विकास सातदिवे,प्रशांत परदेशी यांनी केली.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात प्रोव्हीशन गुरन.७६५/२०२०, महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोना.निलेश बाविस्‍कर हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *