साकेगाव येथे तरूणावर प्राणघातक हल्ला


भुसावळ –
तालुक्‍यातील साकेगाव येथील एका तरूणावर भुसावळ येथील तरूणाने सुर्‍याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दि.६ आॅगस्‍ट गुरूवार रोजी घडली असून त्‍याला गंभीर दुखापती झाल्याचे समजते. साकेगाव येथील सागर धनगर या तरूणाचा भुसावळ येथील एका तरूणाशी वाद झाल्‍याचे समजते व आज सायंकाळी त्‍याने सुर्‍याने सागरवर सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. भर दिवसा घडलेल्या या हल्‍ल्‍यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सागर हा गंभीर जखमी झाला असून त्यास गंभीर अवस्थेत डॉ. उल्हास पाटील यांच्‍या गोदावरी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोर हा भुसावळा येथील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *