भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन संपन्न


भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील दि भुसावळ पिपल्स चॅरिटेबल संस्थेचे दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दिनांक २३ जुलै २०२० रोजी “.चॅलेंजेस अॅड अपाॅरच्युनीटीज इन अनऑरगनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा ” या विषयावर राष्ट्रीय स्तराच्या वेबिनार चे आयोजन करण्यात आले .
या वेबिनार चे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दादासाहेब दिलीप रामू पाटील यांचे हस्ते संपन्न झाले .उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आर .पी . फालक यांनी वेबिनार मध्ये सहभागी प्राध्यापकांना संबोधित केले.
या राष्ट्रीय वेबिनरच्या प्रथम सत्रात आर टी एम नागपूर विद्यापीठातील सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ प्राध्यापक डॉ श्रीनिवास खांदेवाले यांनी तर द्वितीय सत्रात व्ही बी एस पूर्वांचल विद्यापीठ, जौनपुर (उत्तर प्रदेश) येथील व्यवस्थापन विद्याशाखेचे डीन प्रा डॉ अविनाश पाथर्डीकर यांनी ” चॅलेंजेस अॅड अपाॅरच्युनीटीज इन अनऑरगनाइज्ड सेक्टर इन पोस्ट कोविड एरा ” ” या विषयावर सखोल संशोधनातमक व्याख्याने देऊन उपस्तितांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत .समारोप सत्रात प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी उपस्थितांना संबोधित केले
भोळे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखेच्या विषयांनी समाईकरित्या आयोजित केलेल्या या वेबिनार मध्ये सत्र चेअरमन म्हणून भुसावळ येथील भोळे महाविद्यालयातील प्रा.अंजली पाटील यांनी काम पाहिले .समारोप सत्रात प्रातिनिधीक मनोगत प्रा .डॉ. विजयकुमार वानखेडे (जळगाव) , आणि प्रा. विनोदकुमार पठाडे (नाशिक.) यांनी सादर केले .वेबिनार मध्ये देशभरातून 425 संशोधक आणि प्राध्यापक सहभागी झाले होते .वेबिनार आयोजनासाठी कन्व्हेनेर म्हणून प्रा.डॉ.आर एम सरोदे , सह आयोजक म्हणून प्रा डॉ जयश्री सरोदे, समन्वयक म्हणून प्रा संगीता धर्माधिकारी तर आयोजन सचिव म्हणून प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यां सह प्रा.दिपककुमार जैस्वार , प्रा.अंजली पाटील, प्रा.माधुरी पाटील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असे आयोजक समिती सचिव प्रा.डॉ.दयाघन राणे व प्रसिद्धी प्रमुख प्रा डॉ संजय डी. चौधरी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *