भुसावळात वनसंवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
वनसंर्वधन दिना निमीत्त येथील गोसेवा परिवार व सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे शहरातील टी व्ही टॉवर मैदानावर शासनांच्या नियमांचे पालन करून गुरुवार २३ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले .
या मैदानावर याआधी सुद्धा या दोन्ही संस्थातर्फे वृक्षारोपण करण्यात आले होते मात्र कोरोनाचे पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे व या प्रांगणावर पालिकेतर्फे बाजार भरविण्यात येत होता तसेच या भागात
कंटेनन्मेंट झोन असल्याने या भागात येता न आल्याने ही सर्व रोपे (वृक्ष) जळून गेली . म्हणून वनसंर्वधन दिना निमीत्त पुन्हा नवीन पाच झाडांचे रोपण (लागवड) करण्यात आले .
यावेळी सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे, सौ माया चौधरी , तर गोसेवा परिवाराचे
रोहित महाले, मयुर सावकारे उमेश नेवे,रोहन पाटील उपस्थित होते . यावेळी
सौ तुलसी माधवानी व पर्यावरण प्रेमी चंद्रशेखर जंगले यांचे मार्गदर्शन लाभले .
वृक्षसंर्वधन करणे काळाची गरज -रोहित महाले .
शहरासह ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होवून सिमेंटची जंगले तयार होत आहे . दिवसेंदिवस पर्यावरणातील झाडे कमी होऊ लागली असून मोठ्या प्रमाणावर वन (जंगल ) नष्ट होत आहे . यामुळे वनात राहणारे जंगली प्राणी सुद्धा भरकटल्याने शहरातील लोकवस्ती कडे पाण्याच्या शोधात येऊ लागली आहे . यासाठी झाडे लावून व झाड़े जगवून वृक्षसंर्वधन करणे काळाची गरज आहे . याकरीता प्रत्येकाने आपल्या श्वासाप्रमाणे वनदेवतेची सेवा करुन वनसंर्वधन केले पाहीजे असे मनोगत गोसेवक परिवाराचे रोहित महाले यांनी यावेळी व्यक्त केले .

प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक तरी वृक्ष लावावे- राजश्री नेवे
वनातील प्रत्येक गोष्ट मानवी जिवनास वरदान लाभलेले आहे झाडे आपल्याला सावली फळे आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ह्रदयात चालणारा श्वास देतात. वृक्ष कमी झाली यांची खंत सर्वाना जाणवू लागली आहे प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक तरी वृक्ष लावावे जेणेकरुन आपल्या लावलेल्या झाडामुळे सावली व फळे मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *