भुसावळात साई सेवा समितीच्यावतीने कोठारी देताय गरजुंना दररोज काढा प्यायला

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना संकट कमी होण्‍याऐवजी दिवसेंदिवत वाढत चालले आहे त्‍यावर कुठल्‍याही परिस्‍थितीत नियंत्रण मिळविण्‍याचे प्रयत्‍न शासन,प्रशासन,राजकिय, सामाजिक अशा विविध स्‍तरावर सुरू आहे.
साईसेवक,नगरसेवक तथा साईजीवन सुपर शाॅपीचे संचालक निर्मल(पिंटू )कोठारी यांनी कडकडीत लाॅकडाऊनच्‍या काळात उत्तर भारतसह देशभरात आपआपल्‍या घरी पायी निघालेल्‍या हजारो गरजु नागरिकांना व त्यांचे परिवारांच्या जेवणाची सोय करून (नाष्टा,जेवण,पाणी) यासह रेल्‍वे,लक्‍झरी व अन्‍य वाहनाने त्यांचे गावी जाण्‍याची सोय केली होती.
एवढेच नव्हे तर शहरासह तालुक्यात गरीब परिवारांना किराणा व जिवनाश्‍यक वस्‍तु वाटप , निरजंतुकीकरण (फ़वारणी) , आरोग्य तपासणी आदी उपक्रम मोठ्‍या प्रमाणात राबवून गरीबांच्या मदतीला त्वरीत धाव घेत असणारें पिंटू भाऊ गरीबांचे कैवारी म्हणून सतत कार्यरत आहे .
हजारो नागरिकांना काढयाच्या पाकिटांचे वाटप त्‍यांनी स्वत: स्वखर्चाने केले आहे एवढयावरच न थांबता पिंटू कोठारी यांनी आता जामनेर रस्‍त्‍यावरील साईजीवन सुपर शाॅपीजवळ साई सेवा समिती तर्फे दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्‍यान मोफत काढा वाटप करण्याचे ठरवले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *