लासलगाव येथून रेल्‍वेने पहिल्यांदाच बांगलादेशला कांदा रवाना ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे कोरोना काळात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. व्यापाऱ्यांना सर्वोत्तपरी सुविधा देण्याच्या हेतुने वाणिज्य व परिचालन विभागा कडून व्यापाऱ्यांसोबत वेळोवेळी संयुक्त बैठक घेण्यात येत असून त्या अनुषंगाने लासलगाव येथून बांग्लादेशसाठी कांदा व्‍हीपी रेल्‍वे गाड़ी द्वारे आज दि.२२ जुलै बुधवार रोजी पहिल्यांदाच पाठवण्यात आला आहे.
यात २० व्‍हीपी पार्सल गाड़ी द्वारे हा कांदा दरशना स्थानक (बांगलादेश) या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे वाणिज्य आणि परिचालन विभागाच्या द्वारे आवश्यक असे सर्वोत्तपरी सहकार्य शेतकरी व व्यापाऱ्यांना केले जात आहे.जेणे करून व्यापाऱ्यांना आपला माल पोचवण्या मध्ये कोणतीही अडचण येऊ नये असे भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *