शिरपूर पॅटर्नसाठी घेतली माजी मंत्री अमरिश पटेल यांची भेट ;

 

भुसावळ (प्रतिनिधी )-शिरपूरचे शिल्पकार, विकासरत्न माजी मंत्री अमरिश पटेल यांची सदिच्छा भेट घेऊन शिरपूर पॅटर्न व विकास कामांची माहिती जाणून घेण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,भुसावळचे माजी नगराध्‍यक्ष अनिल चौधरी व जिल्‍ह्‍यातील काही दिग्‍गजांनी भेट घेतली.
शिरपूर मध्ये नगर परिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली त्यामध्ये प्रामुख्याने भुयारी गटार, पाणीपुरवठा योजना,स्ट्रीट लाईट तसेच अद्ययावत अशी नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत,बगीचे यांची माहिती जाणून घेतली.भविष्यात मुक्ताईनगर, सावदा,यावल, फैजपूर, रावेर,भुसावळ या नगरपरिषदांमध्ये शिरपूर पॅटर्न’चे देशभरात तो राज्यामध्ये सुरू आहे त्याअनुषंगाने काम करण्याचा माझा आणि आमदार चंदूभाऊंचा मानस आहे असे भुसावळचे माजी नगराध्‍यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष भुपेश पटेल,रावेरचे माजी नगराध्यक्ष शितल पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे,शामकांत ईशी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *