भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोविड १९ या महामारीच्या काळात पीएम केअरला सहकार्य म्हणून १ लाख ०८ हजार ४८७ रूपयांचा मदत निधी देण्यात आला . या मदत निधीचा धनादेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेकडे १६ जुलै रोजी सुपुर्द करण्यात आला .
यावेळी श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे व संघाचे मार्गदर्शक जी.आर .ठाकूर (मामा) , संघाचे उपाध्यक्ष सुरेश दत्तात्रय कुरुमभट्टी, संघाचे ऑडिटर दिनकर झेंडू बेंडाळे , तसेच संघाचे कोषाध्यक्ष अर्जुन रघुनाथ विसपुते उपस्थित होते . .
श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ राष्ट्रीय आपत्तीमध्ये आजपावेतो नेहमी अग्रेसर असतो.जेष्ठ नागरिकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे



