एका गावठी कट्टासह चाकू व दोन आरोपी ताब्यात बाजारपेठ पोलीसांची कारवाई


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नाहाटा चौफुली नजिक भागात दोघांना बाजारपेठ पोलिसांनी एका गावठी कट्टासह चाकू बाळगतांना रंगेहाथ जेरबंद केल्याची घटना येथे घडली .
शहरातील नाहाटा चौफुली भागात अजय गोंडाले व त्याचे दोन साथीदार काहीतरी हेतूने त्या परिसरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळल्यावरून यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे ,गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी पोना रमण सुरळकर,पोकॉ विकास सातदिवे,पोकॉ ईश्वर भालेराव,पोकॉ प्रशांत परदेशी अशांनी घटनास्थळी रवाना केले .
यावेळी आरोपी अजय गोंडाले, शुभम पचरवाल, विक्रांत उर्फ विक्की अनिल तायडे राहणार भुसावळ हे दोघेही घासीलाल वडेवाल्यांच्या दुकानजवळ उभे असलेले दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला मात्र पोलिसांनी शिताफतीने त्यातील दोघांना ताब्यात घेतले . त्यांची अंगझडती घेतली असता शुभम पचरवाल जवळून १५ हजार रुपये किमतीचे गावठी कट्टा व विक्की जवळून चाकू मिळून आला . या दोघांना बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणले असून आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तर यातील आरोपी अजय गोंडाले फरार झाला असून पोलीस शोध घेत आहे.
शस्त्र साठा येतो कसा व कुठून ?
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संसर्ग रोखण्याकरीता शहरात सर्व पोलीस यंत्रणा अहोरात्र नागरिकांच्या रक्षणासाठी झटत असून खबरदारी घेत आहेत .अश्या परिस्थितीचा मात्र चांगलाच गैरफ़ायदा गुन्हेगार व गुन्हेगारीवृतींच्या लोकांनी चांगलाच घेतल्याचे भुसावळ शहरात दिसून येत आहे . शहरात गेल्या महिनाभरापासून दिवसेंदिवस गावठी कट्टयासह जिवंत काडतुस पोलिसांच्या हाती लागत आहे .यामुळे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा येतोच कसा व कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *