भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव रोड- नवोदय चौफुली ते यावल नाका रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे -पालिका प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना तालुका संघटक धिरज पाटिल यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी डाके यांना ऑनलाइन निवेदन देवून केली आहे . मुख्याधिकारी डाके गुरुवार रोजी चार्ज घेणार असल्याची चर्चा आहे .
सध्या भुसावळमध्ये संचारबंदी आहे, नागरिक काटेकोरपणे संचारबंदीचे पालन करीत आहोत. रस्त्यावर रहदारी कमी आहे म्हणून जळगाव रोड- नवोदय चौफुली ते यावल नाका रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे, कारण दोन दोन फुटाचे खड्डे रस्त्यावर असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मागच्या एका वर्षात चार वेळेस या रस्त्याची दुरुस्ती वेगवेगळ्या कारणांमुळे झाली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुसावळ भेटीच्या दोन वेळेस तसेच गणेशोत्सव व नवरात्री मुख्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या वर्षी अजून दुरुस्ती नाही. पावसामुळे हे खड्डे आणखी मोठे होतील आणि अपघाताची संख्या वाढेल. मागील काही वर्षांत खड्ड्यामुळे अपघातात अनेक जण दगावले आहेत त्यात याच रस्त्यावरील अनेक ठिकाणची स्ट्रीट लाईट बंद आहे. वारंवार निवेदने, सूचना करून सुद्धा त्यावर उपाय केला गेलेला नाही. आज सर्वांची मोठी जबाबदारी म्हणजे कोरोना वर मात करणे आहे, परंतु रस्त्यावरील खड्डयामुळे जीव गेला तर जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल. हे सर्व खड्डे सर्वांसाठी धोकेदायक बनण्याच्या आधी नगरपालिका प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जळगाव रोडचे रहिवासी शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.



