भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वाल्मीक नगर भागातील गब्बर चावरीया यांच्या घरामागे जुगार खेळ सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत सहा जुगारींना अटक केली आहे . मंगळवारी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत ११ हजार ३९० रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत विकास वसंत वलकर वय ३२ , अजय दीपचंद बोयत ३८ , करण गोपाल ढोलपुरे २५, हेमंत रमेश ढिंक्याव ३०, राहुल अशोक टाक ३० , आकाश रायसिंग पंडित वय २४, सर्व रा.वाल्मिक नगर, भुसावळ यांना अटक करण्यात आली. आरोपी झन्ना-मन्ना नावाचा माग पत्यावर जुगार पैशाने खळताना आढळले तसेच आरोपींच्या ताब्यातून ११ हजार 3९० रुपयांची रोकड तसेच जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक्क पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, नाईक रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, आकाश सुरळकर आदींनी केली.



