भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातील खंडवा स्टेशनची मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी 8 जुलै रोजी विभागातील सर्व शाखा अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
या निरीक्षणात खंडवा स्टेशन निरीक्षण , बाह्य परिसर आणि खंडवा माल गोदामाची पाहणी केली.यावेळी माल गोदामात लदान आणि उतरानच्या प्लेटफार्म ची लांबी वाढवण्यासाठी सुचना देण्यात आल्या. माल गोदामातील गेटचे काम आणि ट्रकला येण्या जाण्यासाठीचा पक्का मार्ग जुना 8 मीटरचा रोड़ हा 10 मीटर रुंदीपर्यंत वाढविण्यासंबंधी सुचना देण्यात आली.
या पाहणीत वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) निसितकुमार मल , जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, मुख्य वाणिज्य निरीक्षक (खंडवा) एनके शर्मा, आणि सर्व कर्मचारी पाहणी दरम्यान उपस्थित होते.



