वरणगाव (प्रतिनिधी )-
तळवेल शिवारातील शेतातून सुमारे एक लाख रुपये किंमतीचे शेती साहित्य चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवार ७ जुलै रोजी उघडकीस आली. तळवेल शिवारातील गट नंबर ७४८ मध्ये सोपान हरी राणे यांचे शेत असून या शेतामध्ये पक्के वीट बांधकाम केलेले घर बांधण्यात आले आहे. शेतीसाठी लागणारे एक लाख २३ हजार ३०३ रुपये किमतीचे तण नाशक मटेरीयल, युरीया पोट्याशिअम , ग्लाय फॉस्पेट आदी साहित्य चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार मंगळवार रोजी उघडकीस आला.
या प्रकरणी सोपान हरी राणे ६६ यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.



