मध्य रेल्वेने १०० दिवसांत केली १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
 लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान १०० दिवसांत मध्य रेल्वेने २.५४ लाख वॅगन मधून १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक  केली.
 . २३ मार्च २०२० ते ३० जून  २०२० या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण ५,३०६ मालगाड्या चालविल्या.
 दररोज सरासरी २,५४३ वॅगन  माल वाहतूकीसाठी भरण्यात आले .
  विना-व्यत्यय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने  १ लाखांपेक्षा जास्त कोळशाने भरलेल्या वॅगन ची वाहतूक केली.
 ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व मालाचे  वितरण वेळेवर सुनिश्चित करण्यासाठी, कोविड १९ साथीच्या आजारात लॉकडाऊन असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.  उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत, मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १०० दिवसांत १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतुक यशस्वीरित्या  केली.
वॅगन भारांच्या बाबतीत ते २,५४,३३५  वॅगन  माल भरले म्हणजे २३ मार्च २०२० ते ३० जून २०२० या १०० दिवसांत मध्य रेल्वेने ५,३०६ मालगाड्यांतून कोळसा, अन्नधान्य, साखर, 
पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि  स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली.  या कालावधीत दररोज सरासरी २,५४३ वॅगन मालाची वाहतूक केली .
एकट्या मध्य रेल्वेने, विना-व्यत्यय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी  १,००,३७१ 
कोळशाच्या वॅगनचा पुरवठा विविध उर्जा प्रकल्पांना केला.  तसेच  ३,४७९  वॅगनमधून अन्नधान्य आणि साखर,  शेतकर्‍यांच्या हितासाठी ९,९८० वॅगन खते आणि २,६८९ कांदा;  पेट्रोलियम पदार्थांच्या २५,८२१ वॅगन  , लोह आणि स्टीलच्या ५,६२२ वॅगन,   १५,४६० वॅगन सिमेंट , ७९,६४३ कंटेनर वॅगन आणि सुमारे ११,२७० वॅगन  डी-ऑईल केक व इतर वस्तूची वाहतूक केली .
 मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये   यासाठी रेल्वे कर्मचारी २४×७ सातत्याने  विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत.  लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत.  ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट्स, लोकोमोटिव्ह्ज, डबे आणि वॅगन्सचे देखभाल करणारे कर्मचारी गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी  पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.  पुरवठा साखळी अखंड ठेवत ते प्रत्यक्ष मैदानावरील  कोरोना योद्धा ठरले आहेत.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *