भुसावळ (प्रतिनिधी )-
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता त्वरित मिळावा तसेच भुसावळ पालिकेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी द्यावा या मागणी संदर्भात माजी नगरसेवक व पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी दिपक काशिनाथ धांडे यांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवार २ जुलै रोजी निवेदन दिले .
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील ४८ लाभार्थ्यांना जानेवारी२०२० मध्ये बांधकाम परपिषण पत्र देण्यात आले , त्या अनुषगाने सर्व लाभार्थ्यांनी आप आपली जुनी घरे पाडून नवीन घरे बांधकामाला सुरुवात केली जानेवारी ते मार्च या ३ महिन्याच्या कालावधी मध्ये सर्व लाभार्थ्यांनी आपल्या घरांची कामे स्लाप लेव्हल पर्यंत केलेली आहे परंतु नगरपालिकेने लाभार्थ्यांना १८ मार्च २० रोजी फक्त ४०हजार रुपये पहिला हफ्ता दिलेला आहे
त्या नंतर हफ्ता गेल्या ४ महिन्या पासून भुसावळ नगर पालिकेने पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना
दुसऱ्या हफ्त्याचे १ लाख रुपायांची बिले दिलेली नाही. या संदर्भात भुसावळ नगर पालिका यांच्या कडे वारंवार विचारणा केल्यावर येथे कायम मुख्याधिकारी नाही असे कारण सागण्यात येते त्यामुळे भुसावळ नगरपालिकेत वारंवार फेऱ्या मारून सुध्दा काही एक उपयोग झालेला नाही गेल्या ७ महिन्या पासून हे लाभार्थी भाड्याच्या घरात राहत आहे तरी आपण या निवेदनाचा व गरीब लाभार्थीच्या सहनिपूर्वक विचार करून या लाभार्थीच्या बँक खात्यात पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हफ्ता जमा करावा असेही निवेदनात नमूद केले आहे .



