पान सेंटर सुरू करण्यासाठी प्रातांना निवेदन ;


भुसावळ ( प्रतिनिधी) –
गेल्या तीन महिन्यांपासुन पान सेंटर व दुकाने बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने दुकान उघड़ण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील पान विक्रीची दुकाने, व पान सेंटर धारकांनी केली असून याबाबत प्रांताधिकारी यांना गुरुवार रोजी निवेदन देण्यात आले आहे .
भुसावळ शहरात पान विक्रीची विविध ” पान सेंटर ” व दुकाने असुन त्यात आम्ही सुटे पानाचा विडा,मसाला पान,फरसानचे पॅकेट, पाण्याच्या पॅक बाटल्या विक्री करतात , पान देखील कागदपत्रांमध्ये बांधून देतो.
ग्राहक व आमचे पूरेसे अंतर अशी आमची बैठक व्यवस्था असते , तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करु . स्वतः तोंडाला मास्क लावून आम्ही आमचा व्यवसाय करणार आहे.
मार्च महिन्यांपासून आमची दुकाने बंद आहे. दुकाने हेच उपजीविकेचे साधन असल्याने आमची कुटुंब पूर्णपणे त्यावर अवलंबून आहे. आज रोजी आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. भुसावळ शहरात कपडे,कटलरी,सलून दुकाने, चपला-बुटांची दुकाने,इलेक्ट्रिक दुकाने, हार्डवेअर दुकाने सुरू झाल्याने आमची दुकाने सुरू करण्यास काहीही अडचण राहिलेली नाही.तरी शहरातील सर्व पान विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.तसेच शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करू व शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास याला सर्व पान विक्रेते जबाबदार राहतील अशा प्रकारचे निवेदन दिनांक २ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *