ठाकूर परिवारातील कन्येचा वाढदिवस आदिवासी बालगोपाळा सोबत साजरा; नागादेवी पाड्यावर खाऊवाटपातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

भुसावळ (प्रतिनिधी) -: वाढदिवस म्हटला की केक, सजावट आणि मित्रपरिवारासोबतचा आनंदी सोहळा असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत गरजू मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम नागादेवी पाडा येथे राबविण्यात आला.

देवगिरी कल्याण आश्रम, जिल्हा भुसावळ यांच्या नगरप्रमुख सौ. विजया निकम यांच्या सहकार्याने श्री. प्रकाश ठाकूर दादा यांच्या मुलीचा वाढदिवस नागादेवी पाडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील लहान मुलांना नाश्ता तसेच सुका खाऊ वाटप करण्यात आला .सामाजिक जाणीव, माणुसकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या वाढदिवस सोहळ्यातून पाहायला मिळाला. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्यासोबतच सामाजिक कार्याची प्रेरणाही मिळते. असे भावोद्गार ठाकूर परिवाराने व्यक्त केले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
  या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. मुलांना नाश्ता आणि खाऊ देत त्यांच्यासोबत खेळ खेळून आनंदाचे क्षण घालविण्यात आले. केवळ स्वतःचा आनंद साजरा न करता समाजातील गरजू घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी होता असे मत यावेळी विजया निकम यांनी व्यक्त केले.