भुसावळ (प्रतिनिधी )- दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर , सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचे वतीने भुसावळ येथे वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ब्राह्मण संघ भुसावळ या ठिकाणी दिनांक एक ते पाच ऑक्टोबर 2026 यादरम्यान आयोजित करण्यात आले त्याचे उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. सतीश वर्मा यांनी सांगितले. ब्राह्मण संघ भुसावळ चे अध्यक्ष गणेश बडवेकर यांनी लोक चित्रकला समजुन घेणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आपल्या संबोधनातून केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रागिणी संगीत कला महाविद्यालय बऱ्हाणपूर चे प्राचार्य डॉक्टर सतीश वर्मा यांनी कलेबद्दल असलेली आपुलकी आणि तिचा प्रसार आणि प्रचार किती महत्त्वाचा आहे यावर प्रकाश टाकला . सुरुवातीला दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर चे कार्यक्रम अधिकारी श्री विवेक श्रीरामे तसेच ब्राह्मण रंगाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, डॉ . सतीश वर्मा, चित्रकार रमाकांत भालेराव यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी स्थानिक चित्रकार रमाकांत भालेराव यांनी चित्रकला व त्याचे महत्त्वाचे बिंदू आणि आयोजनाबाबत सविस्तर माहिती आपल्या प्रस्तावनेतून दिली. यावेळी सर्व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले तर आभार रमाकांत भालेराव यांनी मानले पाच दिवस चालणाऱ्या या वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिरामध्ये स्थानिक चित्रकार रमाकांत भालेराव हे वारली चित्रकला संदर्भात प्रशिक्षण देणार आहेत प्रशिक्षणार्थींमध्ये सर्व वयोगटातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ब्राह्मण संघाच्या सभागृहात हे शिबिर संध्याकाळी पाच ते सहा या वेळात सुरू राहील.