भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे–दौंड रेल्वेमार्गावरील पुणे यार्ड येथे विद्यमान रेल्वे संरचनेतील डीडीएस पॉइंटच्या बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा भुसावळ विभागातून धावणाऱ्या पुढील रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन 1) गाडी क्रमांक 12136 नागपूर–पुणे एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दि. 01.08.2026 रोजी नागपूर येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर–पुणे दरम्यान रद्द राहील. 2) गाडी क्रमांक 11406 अमरावती–पुणे एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दि. 01.08.2026 रोजी अमरावती येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर–पुणे दरम्यान रद्द राहील. 3) गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी–पुणे एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दि. 31.07.2026 रोजी जम्मूतवी येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर–पुणे दरम्यान रद्द राहील. गाडीचे शॉर्ट ओरिजिनेशन 1) गाडी क्रमांक 12135 पुणे–नागपूर एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दि. 02.08.2026 रोजी गाडी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानक येथून 17.45 वाजता सुटेल. रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच सुरक्षित रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे ट्रॅफिक ब्लॉक आवश्यक आहेत. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. प्रवाशांनी या बदलांचा विचार करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


