भुसावळ (प्रतिनिधी) - रेल्वे प्रशासनाने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच त्यांच्या सोयीसाठी खंडवा–सनावद दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या दि. 29 जुलै 2026 व 30 जुलै 2026 रोजी चालविण्यात येणार आहेत. विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे— - गाडी क्रमांक 01091 विशेष : दि. 29.07.2026 व 30.07.2026 रोजी खंडवा येथून 09.00 वाजता सुटेल आणि सनावद येथे 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01092 विशेष : दि. 29.07.2026 व 30.07.2026 रोजी सनावद येथून 11.10 वाजता सुटेल आणि खंडवा येथे 12.35 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01093 विशेष : दि. 29.07.2026 व 30.07.2026 रोजी खंडवा येथून 13.35 वाजता सुटेल आणि सनावद येथे 15.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01094 विशेष : दि. 29.07.2026 व 30.07.2026 रोजी सनावद येथून 15.30 वाजता सुटेल आणि खंडवा येथे 16.55 वाजता पोहोचेल. थांबे : अजंती, अत्तर, कोटलाखेरी आणि निमारखेरी. रचना : 8 मेमू डबे. प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी RailOne (रेलवन) ॲपचा वापर करावा. तसेच संबंधित विशेष गाड्यांचे थांबे व सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी NTES ॲप डाउनलोड करावे.


