धरणगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना धरणगाव शहराच्या वतीने भव्य वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. धरणगाव येथील विरंगुळा केंद्रातील स्वामी समर्थ केंद्राच्या मागील परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. शिवसेनेचे उपनेते तथा रावेर व नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून, प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम भाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शिवसेना शहरप्रमुख भागवत चौधरी, लक्ष्मण पाटील सर, नगरसेवक लक्ष्मण माळी, सुनील चौधरी, परमेश्वर महाजन, ज्योती पाटील, हेमांगी अग्निहोत्री, प्रा. कविता महाजन, उर्मिला पवार, दुर्गा सातपुते, रूपाली चौधरी, प्रिया देसले, रूपाली महाजन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, राजेंद्र ठाकरे, राहुल रोकडे, कृपाराम महाजन, रवींद्र अहिरे, गोपाल महाजन, प्रेमराज चौधरी, सुकालाल चौधरी, कैलास चौधरी, वसीम खान, रियाज बागवान, विजय पाटील, बापू महाजन, आर. डी. महाजन सर, संजय पवार सर, अरुण पाटील, अलीम शिरपूरकर, विष्णू महाजन, सागर पाटील, सुनील चव्हाण, गजानन महाजन, रमेश चव्हाण, विनोद रोकडे, रणजीत सिकारवार, सोपान महाजन, फिरोज खान, दिनेश वाणी, सुनील कापूरे, स्वप्नील परदेशी, जिभाऊ पाटील, लिलाधर पाटील, गणेश चौधरी, अरविंद चौधरी आदींसह परिसरातील नागरिक व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाचे जतन, संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमाला शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या उपक्रमाची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धरणगाव शहराचे प्रसिद्धीप्रमुख गजानन महाजन यांनी दिली.



