रावेर तालुका कार्यकारिणीचे पुनर्गठन; गौतम अटकाळे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

रावेर (प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभा रावेर तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीचे पुनर्गठन तक्षशिला बुद्ध विहार, सावदा रोड येथे नुकतेच पार पडले. यावेळी अध्यक्षपदी आद. गौतम बन्सी अटकाळे बौद्धाचार्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. आद. सदाशिव निकम गुरुजी यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली तसेच सभेचे सूत्रसंचालन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जिल्हाध्यक्ष आद. सुमंगल तथा रविंद्र अहिरे होते.
याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. प्रा. संजीव साळवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल रमेश साळवे, जिल्हा संस्कार सचिव आद. संघरत्न दामोदर, आद. विजय अवसरमल गुरुजी, जिल्हा संघटक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत तालुका सरचिटणीसपदी आद. अॅड. दीपक सुरेश तायडे, तालुका कोषाध्यक्षपदी आद. महेंद्र गोपाळ वानखेडे, उपाध्यक्ष (संस्कार)पदी आद. सदाशिव नारायण निकम, उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन)पदी तनिश मंगल बोदोडे, उपाध्यक्ष (संरक्षण)पदी आद. प्रविण प्रदीप धुंदले यांची निवड करण्यात आली.
तसेच हिशोब तपासणीसपदी आद. कांतिलाल भावडू गाढे, कार्यालयीन पदावर आद. रितेश जगन निकम, केंद्रीय शिक्षक संस्कार सचिवपदी आद. युवराज किटकूल तायडे, संस्कार सचिवपदी आद. मनोहर टोपलू ससाणे, संघटक (संस्कार)पदी आद. विजय रघुनाथ भोसले यांची निवड झाली.
सचिव (पर्यटन व प्रचार) म्हणून आद. सिद्धार्थ शंकर सुरदास व आद. राहुल ताराचंद लहासे, सचिव (संरक्षण) म्हणून आद. महेंद्र रामदास तायडे, संघटक (समता सैनिक दल) म्हणून आद. धनराज वसंत रायमडे व आद. विनोद चिंतामण तायडे, संघटक (प्रचार, प्रसार व पर्यटन) म्हणून आद. संतोष प्रेमचंद तायडे यांची निवड करण्यात आली. तालुका संघटक (संस्कार) म्हणून आद. आकाश छगन ठाकणे व आदरणीय राजेंद्र अटकाळे बौद्धाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली.
माजी पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला श्रद्धांजली
कार्यक्रमादरम्यान माजी पदाधिकारी आद. मनोहर टोपलू ससाणे यांच्या पत्नी यांचे दि. ३ जुलै रोजी निधन झाल्याबद्दल उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर नवनिर्वाचित सरचिटणीस आद. अॅड. दीपक तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरणत्तयने सभेची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रावेर तालुक्यातील ग्रामीण भागातील बांधवांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.