भुसावळमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा; भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले :

भुसावळ (प्रतिनिधी ) — भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने 19 एप्रिल 2026 रोजी भुसावळ शहरात परशुराम भक्तांमध्ये अवर्णनीय उत्साह पाहायला मिळाला. भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2026 तर्फे आयोजित भव्य शोभायात्रेची सुरुवात श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (कॅबिनेट मंत्री), ना. संजय सावकारे, सौ. रजनीताई सावकारे, नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे, माजी आमदार संतोषभाऊ चौधरी तसेच समितीचे अध्यक्ष वेदप्रकाश ओझा, उपाध्यक्ष रोहित कुलकर्णी, सचिव घनश्याम मिश्रा, आदित्य शर्मा, कोषाध्यक्ष देवेश कुलकर्णी आणि ब्राह्मण समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते भगवान परशुरामांची आरती व माल्यार्पण करून करण्यात आली.

शोभायात्रेतील आकर्षण म्हणून मलकापूर येथील श्रीराम ढोल पथक, सौ. अनघा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेले महिला, मुली व मुलांचे ध्वज पथक, खड्ग पथक व परशुपथक विशेष ठरले.

यात्रेदरम्यान शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भगवान परशुरामांचे पूजन केले. यामध्ये संतोषभाऊ चौधरी, उद्योगपती मनोज बियाणी, नगरसेवक युवराज लोणारी, राजू आवटे, बबलू बऱ्हाटे, राहुल तायडे, मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, परीक्षित ब्रहाटे, श्रेयस इंगळे आदींचा समावेश होता. सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

शिस्तबद्ध शोभायात्रेदरम्यान विविध ठिकाणी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. गोपाल रेस्टॉरंटचे संचालक मयूर अग्रवाल व मितीश अग्रवाल यांनी सरबत वाटप केले, अग्रसेन चौकात ॲड. गोकुळ अग्रवाल व अग्रवाल समाजाने पाणी व कुल्फीचे वितरण केले, तर गुजराती स्वीटचे कपिल मेहता व सतीश खडायते यांनी शीतपेयाचे वाटप करून भक्तांची सेवा केली.

अग्रसेन चौक, बसवेश्वर प्रतिमा व महाराणा प्रताप चौक येथे माल्यार्पण करत शोभायात्रा पुढे सरकली. शेवटी म्युनिसिपल पार्क येथील राम मंदिरात समारोप झाला, जिथे हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या त्रिदिवसीय सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कैलास उपाध्याय, उमाकांत शर्मा, अनिरुद्ध कुलकर्णी, भूषण वैद्य, गौरव हिंगवे, भुषण जोशी, अनुप धावडे, प्रशांत उपासनी, धनंजय नाईक, तेजस जोशी, मंगेश भावे, जयप्रकाश शुक्ला, आशिष तिवारी, आनंद जोशी, खुशाल जोशी, संकेत कुलकर्णी, प्रशांत शर्मा, गोपाळ जोशी, दीपक पाथरकर गुरुजी, राधेश्याम दुबे, प्रविण मिश्रा, योगेंद्र दुबे, राजेश दुबे, अनिल कुमार तिवारी (लाला भैया), ए.के. तिवारी आदी पदाधिकारी व सदस्यांनी गेल्या महिनाभरापासून अथक परिश्रम घेतले.