भुसावळ (प्रतिनिधी) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील महिला वकीलांनी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी नगरपरिषद रुग्णालयाचे सहकार्य लाभले.

शिबिराची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. महिला वकील कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात, याची जाणीव ठेवून ॲड. जास्वंदी भंडारी यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले. विशेषतः महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांसाठी हे शिबिर घेण्यात आले.
नगरपरिषद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य करत वैद्यकीय पथक उपलब्ध करून दिले. डॉ. नृपाली सावकारे, जागृती चित्ते, राधा पाटील, सुनिता चित्ते व सेविका यांनी तपासणी केली.
ॲड. चित्रा आचार्य, ॲड. नीता पाटील, ॲड. संगिता चंदन, ॲड. अश्विनी डोलारे यांनी वैद्यकीय पथकाचे स्वागत केले. या शिबिराचा लाभ न्यायालयात नियमित येणाऱ्या अनेकांनी घेतला. शिबिर यशस्वीतेसाठी ॲड मीना कोळी, शोभाताई गायकवाड सह सर्व महिला वकीलांनी सहकार्य केले .



