भुसावळ (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
शाळेतील मानव पाटील, वेदांत सरोदे, लावण्या सोनवणे, केजल चौधरी आणि शेख उमर या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती प्रभावीपणे मांडली.
प्राचार्या नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला व्हाईस प्रिंसिपल मनप्रीत कौर यांच्यासह श्रद्धाली घुले, रितू प्रभू देसाई, प्रतिभा काकडे, हर्षला पाटील, प्रीती देशपांडे, सोनाली शिवरामे, कय्युम शेख, अकबर खान, विजय संकत तसेच इतर शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली शिवरामे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरी प्रभुदेसाई यांनी मानले.
फोटो ओळ – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करतांना स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर सोबत डावीकडून हर्षला पाटील,प्रीती देशपांडे,सोनाली शिवरामे,मनप्रीत कौर,श्रद्धाली घुले,रितू प्रभू देसाई,प्रतिभा काकडे,कय्युम शेख,अकबर खान,विजय संकत आदी.


