भुसावळ ( प्रतिनिधी) – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दिपनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात भुसावळ औष्णिक वीज केंद्र, दिपनगर येथील मुख्य अभियंता विराज जी चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमुख्य अभियंता राजेश जी कुंभार, उप औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश जी मेश्राम तसेच डॉ. प्रशांत जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्ट विभागाचे प्रमुख अतुल कुमार अगरवाल, नरेंद्र भालेराव, सायली केदारे, सुनिल अटकाले आणि नयुम पठाण यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सपकाळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


