जय किसान फार्मर्स फोरमचा कृषिरत्न पुरस्कार जाहीर :२७ डिसेंबरला नाशिकमध्ये ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान

जळगाव (प्रतिनिधी ) — भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त जय किसान फार्मर्स फोरम, गोदावरी बायो फर्टिलायझर्स इंडस्ट्री आणि आमची माती आमची माणसं यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथील प. सा. नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय, नेहरू गार्डन येथे होणार आहे.

या कार्यक्रमात सह्याद्री फार्मचे संस्थापक व अध्यक्ष विलास शिंदे, आमदार राहुल ढिकले आणि माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या हस्ते राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पूरकर, मल्टीमोलचे संचालक शशिकांत शेट्टी, विविध भारतीचे राष्ट्रीय सेवा प्रमुख डॉ. संतोष जाधव, ओम गायत्री ग्रुपचे मधुकर गवळी, कृषीतज्ज्ञ लक्ष्मण डोळे, इफकोच्या माजी संचालिका साधना जाधव, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सदुभाऊ शेळके, भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य बापूसाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये यादवराव केशवराव ढवळे, दीपक दगुजी पवार, श्रीराम भानुदास तायडे, निवृत्ती अशोक शिंदे, प्रकाश केशवराव गडदे, गणेश एकनाथ पवार, तेजस नर्सरी, संतोष बाबुराव गवारे, विक्रम बाळासाहेब महाले, सचिन सोनोने, शाम भगवान बन, सय्यद गनीभाई हुसेन, युवराज बाळासाहेब जाधव, गजानन भानुदास परिहार, प्रितम दिलीप शिसोदे, बाळू पंडित बहिरम, अभिमन्यू लक्ष्मण ठाकरे, दत्तू केवजी बागूल, देवराम अनाजी पालवी, बापू वसंत पगार, प्रविण छगन जाधव, अभयसिंह मोहनराव पाटील, राजेश गंगाधर मुसळे, नितीन लक्ष्मण शेवाळे, अनिल भाऊराव देवरे, श्वेता संजय इंगळे, सुनील दामोदर धात्रक, रमेश पांडुरंग ठोसरे, शिवकृपा ऑनलाइन ई-सेवा आधार केंद्र, नंदिनी महेंद्र जाधव, रोहिदास बापूराव पाटील, पांडुरंग जीवामृत युनिट, युवराज जाधव, समीर शेख आणि रविंद्र दिनकर जगताप यांचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, पैठणी साडी, सन्मानपत्र, फेटा व शेतकरी गौरव विशेषांक असे आहे.

कार्यक्रमात सेंद्रिय शेतीवर चर्चासत्र होणार असून आमची माती आमची माणसं शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. सुरुवातीला व्हॉईस ऑफ नाशिक आणि प्रसिद्ध गायिका सुखदा महाजन यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे करणार आहेत. या सोहळ्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.