भुसावळ (प्रतिनिधी):
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन तसेच भुसावळ शहराचे माजी आमदार निळकंठ चिंतामण फालक यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भुसावळ शहरात शोककळा पसरली असून एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि समाजसेवेला वाहून घेतलेले नेतृत्व हरपल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात फालक यांनी उल्लेखनीय योगदान दिले. ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. साधी जीवनशैली, स्पष्ट विचारसरणी आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली जवळीक हीच त्यांच्या कार्याची ओळख होती.
त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाविद्यालय, पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांसह कॉलेजचे व्यवस्थापन मंडळ, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


