भुसावळ येथे मालमत्ता व्यावसायिकास मारहाण; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ येथील जामनेर रोड परिसरात एका मालमत्ता व्यवसायिकास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार, २२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण वासुदेव ढाके (वय ४१), हे जामनेर रोडवरील प्रसाद बुक डेपो जवळ उभे असताना एकनाथ उर्फ गब्बर शंकर पाटील भुसावळ येथे मालमत्ता व्यावसायिकास मारहाण; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखलव त्याचा मित्र नरेश बिऱ्हाडे उर्फ गेंडा (दोघे रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) यांनी त्यांच्याकडे येत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “पैसे देऊन तुला मारून टाकू” व “डोक्यात दगड मारू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या झटापटीदरम्यान ढाके यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५, ३५१, ३५२ व ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार को. परिसकर करीत आहेत.