भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर दत्तक गाव किन्ही येथे दि. २३ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर या संकल्पनेवर आयोजित करण्यात आले आहे.
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. महेशभाऊ फालक, प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव मा. श्री. विष्णूभाऊ चौधरी व स्थानिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. अशोकदादा येवले व श्री. मुकेश फिरके उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन स्थानिक एज्युकेशन सोसायटी किन्ही चे सचिव श्री. संजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास महिरे यांनी सादर केले. विद्येची देवता सरस्वती माता व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीपप्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. महेशभाऊ फालक यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे प्रतिपादन केले आणि शिबिराकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील शिबीराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.संगीता भिरूड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. के. राठोड यांनी केले. शिबिरदरम्यान पाणलोट व्यवस्थापन, मतदान जनजागृती,
पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा, थलेसमिया मुक्त समाज, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य अशा विविध विषयांवरती व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रासेयो सल्लागार समिती सदस्य श्री.उमेश पाटील, श्री. राजेश सुरवाडे, प्रफुल वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पवन बारी, सिद्धांत जैन, अश्विनी जाधव, हितेश पाटील, समृद्धी जंगले आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य डी. एन. पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.



