भुसावळ (प्रतिनिधी):- भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे एका २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. १९ रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उज्वला अलकेश कोळी (वय २१, रा. तपत कठोरा, ता. भुसावळ) असे मृत विवाहितेचे नाव असून त्यांच्या पश्चात आठ महिन्यांचे बाळ आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


