भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट बुकिंग अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ६ डिसेंबर २०२५ पासून मध्य रेल्वेवरील निवडक गाड्यांसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून, या प्रक्रियेचा उद्देश बोगस बुकिंग रोखणे आणि तात्काळ कोट्यातील तिकीटे प्रत्यक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचावीत याची खात्री करणे आहे.

ही सुविधा पीआरएस काउंटर, अधिकृत रेल्वे एजंट तसेच आयआरसीटीसी वेबसाइट/अॅपद्वारे केलेल्या तात्काळ बुकिंगसाठी लागू असेल. बुकिंगच्या वेळी प्रवाशाच्या नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी अचूक भरल्यानंतरच तिकीट जारी केले जाईल.
रेल्वेच्या मते, या नव्या यंत्रणेमुळे गैरवापरावर आळा बसेल आणि तात्काळ तिकीट मिळवणे अधिक पारदर्शक होईल
०६ डिसेंबर २०२५ पासून खालील गाड्यांसाठी ओटीपी-आधारित बुकिंग लागू १. 12219 लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस
२. 12221 पुणे – हावडा दुरांतो एक्सप्रेस
३. 12223 लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम जंक्शन दुरांतो एक्सप्रेस
४. 12261 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा दुरांतो एक्सप्रेस
५. 12263 पुणे – हजरत निजामुद्दीन जंक्शन दुरांतो एक्सप्रेस
६. 12289 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
७. 12290 नागपूर – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस
८. 12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस
९. 12298 पुणे – अहमदाबाद जंक्शन दुरांतो एक्सप्रेस
१०. 20101 नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
११. 20670 पुणे – हुबळी जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस
१२. 20673 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस
१३. 20674 पुणे – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
१४. 12025 पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस
१५. 22221 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (अंमल ५ डिसेंबर २०२५ पासून)
विशेष सूचना – 12025 पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये ओटीपी-आधारित व्यवस्था १ डिसेंबर २०२५ पासूनच लागू आहे.
– तात्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांनी आपला मोबाइल क्रमांक अचूक नमूद करावा, अशी रेल्वेने विनंती केली आहे.


