भुसावळ (प्रतिनिधी: भाजपा महायुतीतील नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा सोमवार, 24 रोजी दुपारी तीन वाजता पु.ओं.नाहाटा महाविद्यालयासमोरील नियोजित बसस्थानकाच्या जागेवर होत आहे. सभेच्या अनुशगाने आयोजकांकडून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मंत्री संजय सावकारे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात केवळ मुख्यमंत्र्यांची एकच सभा होणार असल्याने या सभेत मुख्यमंत्री काय बोलतात? याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

भुसावळात आज धडाडणार मुख्यमंत्र्यांची तोफ
जळगाव जिल्ह्यातील एकमेव सभा भुसावळात होत असल्याने या सभेला विशेष महत्व आहे. या सभेत मुख्यमंत्री काय बोलतात? याकडे सर्वाचे लक्ष
लक्षल लागले आहे. भुसावळातील भाजपा पदाधिकार्यांनी सभा यशस्वीतेच्या दृष्टीने अत्यंत काटेकोर पद्धत्तीने नियोजन सुरू केले आहे.
मंत्र्यांनी घेतला आढावा
मंत्री संजय सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी होण्याच्या दृष्टीने रविवार, 23 रोजी दिवसभर आढावा घेतला. शहरातील डी.एस.हायस्कूलच्या प्रांगणावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याने रविवारी येथे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली तसेच येथे मोटारीने ते सभास्थळी रवाना होणार आहेत व मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापुढे भाजयुमो पदाधिकार्यांची रॅली निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


