भुसावळ (प्रतिनिधी ) – :
नॅशनल पोर्टर फ्रंट (राष्ट्रीय कुली मोर्चा) यांच्या वतीने आज भुसावळ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर प्रकाश भालेराव यांना निवेदन देण्यात आले. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने 30.10.2025 रोजी जारी केलेल्या पत्रातील निर्देश तातडीने लागू करण्यात यावेत तसेच कुलींना रेल्वेच्या सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

BOV सेवा : कुलींच्या उपजीविकेसाठी धोका!
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की BOV (बॅटरी ऑपरेटेड व्हेईकल) सेवा ही कुलींच्या कार्याची जागा घेणारी नसून, फक्त पूरक सेवा म्हणून चालवली जाणार आहे.
मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच दिसत आहे
स्थानकांवर धावणाऱ्या BOV गाड्या प्रवाशांसह त्यांचे सामानही वाहून नेत आहेत,
त्यामुळे कुलींच्या पारंपरिक कामावर थेट परिणाम होत आहे,
आणि त्यांच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण झाले आहे
क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष?
निवेदनात हेही नमूद करण्यात आले की मंत्रालयाच्या पत्रातील अनेक महत्त्वाच्या सूचनांकडे क्षेत्रीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही.
कुलींच्या मते रेल्वे पाससह इतर सुविधा अनेक ठिकाणी दिल्या जात नाहीत,काही स्थानकांवर कुलींना पूर्णपणे दुर्लक्षित केले जात आहे,
अनेक वेळा विनंती करूनही कोणतीही ठोस धोरणे लागू केली जात नाहीत.राष्ट्रीय कुली मोर्चाच्या महत्त्वाच्या मागण्या रेल्वे मंत्रालयाच्या 30.10.2025 च्या पत्रातील निर्देशांचे काटेकोर पालन करावे कुलींना रेल्वे व्यवस्थेत सरकारी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे संबंधित सक्षम अधिकाऱ्यांना तत्काळ फाईल आणि अहवाल पाठवला
प्रतिनिधी मंडळातील सदस्यम्हणून
रफीक शेख, फकीरा गवली, जावेद विटल, तारीख करशी, अजीज गवली, विष्णू सोनवणे
तसेच मुंबई झोनचे कोऑर्डिनेटर अनिल सावळे.उपस्थित होते
–


