निंभोरा बुद्रुक ता. रावेर /वार्ताहर :-
जळगाव येथे नुकतीच आर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष व जेष्ठ कलावंत मोहन तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी निंभोरा तालुका रावेर येथील राजीव तुकाराम बोरसे यांची एक मताने नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे संस्थापक सचिव कलाकार व प्रसिध्द निवेदक तुषार वाघुळदे, विजयकुमार कोसोदे, उपाध्यक्ष मोहन गारुंगे,शाम जगताप, बाळू पाटील, दिलीप पाटील, शेषराव परमार , युवराज सोनवणे , रमेश गोयर यासह आदी उपस्थित होते. याप्रसंगी मोहन तायडे ,असोसिएशनचे सचिव तुषार वाघुळदे विजयकुमार कासोदे यांनी बोरसे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.या बैठकीत अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

या निवडीबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील ,खासदार स्मिताताई वाघ, आमदार अमोल भाऊ जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील,माजी आमदार शिरिषदादा चौधरी,माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, डॉ. केतकी पाटील, प्रल्हाद पाटील नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, डॉ.संदीप पाटील, धनंजय चौधरी,विवेक ठाकरे ,हरलाल कोळी ,दीपक पाटील, कडू चौधरी ,प्रल्हाद बोंडे,दिगंबर चौधरी ,दुर्गादास पाटील, रोहिदास ढाके, नरेंद्र ढाके, प्रशांत पाटील, वासुदेव नरवाडे, दुर्गेश पाटील, प्रमोद चौधरी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.



