मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सिने अभिनेते गोविंदा ( ६१ वर्ष) हे त्यांच्या मुंबईतील जुहू येथील घरात अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांना तात्काळ मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात जुहू येथे दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी (११ नोव्हेंबर २०२५) रात्री घडली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असे त्यांच्या मित्र व कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी स्पष्ट केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



