फक्त 15 तासात 100 कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण : भुसावळातील डॉ. तुषार पाटील व विजय फिरके यांचा रणवीर पराक्रम ;

भुसावळ(प्रतिनिधी ) : दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी बावधन रनिंग ग्रुप द्वारा खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये 25 किमी 35 किमी 55 किमी 75 किमी आणि 100 किमी अशी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पुणे येथील खडकवासला या ठिकाणी संपन्न झाली. सदर मॅरेथॉन मध्ये भुसावळचे डॉ. तुषार पाटील नावलौकिक अस्थिरोग तज्ञ हे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सहभागी होते. तसेच त्यांच्या समवेत भुसावळचे विजय फिरके होते

ताप्ती रनिंग ग्रुप चे हे दोघं 100 कि.मी.ची अल्ट्रा रन मॅरेथॉन फक्त पंधरा तासात त्यांनी पूर्ण केली. सदर मॅरेथॉनचा सकाळी दोन वाजता फ्लाग ऑफ झाला. सकाळी सकाळी गारठा थंडीतून वळणाच्या वाटेतून रनिंग करताना डोंगराळ भाग पानशेत आणि खडकवासला येथील नयनरम्य निसर्गातून मॅरेथॉन पटू आपली क्षमतेने धावत होते. धावताना त्यांना थंडी वारा ऊन रात्र दिवस या निसर्गाच्या सर्व बाबींशी झुंज करावी लागली. सदर स्पर्धेत शंभर किमी चा कट ऑफ हा सोळा तासाचा होता परंतु या दोघांनी तो फक्त पंधरा तासातच पूर्ण केला. डॉक्टर तुषार पाटील व विजय फिरके हे दोघेही आंतरराष्ट्रीय जागतिक नावलौकिक असणारा अल्ट्रा कॉम्रेड रनर पूर्ण करणारे जिल्ह्यातील नामवंत मॅरेथॉन पटू आहेत.

ताप्ती रनिंग ग्रुपचे भुसावळ येथील एलआयसी शाखेचे मॅनेजर दीपक पाटील यांनी 25 किमी व जितू पाटील यांनी 55 किमी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पूर्ण केले. भुसावळ येथील सर्व रनर त्यांचे स्वागत तथा अभिनंदन करीत आहेत व त्यांना शुभेच्छा देत आहेत