नारीशक्तीने आदिवासी बांधवा सोबत पाड्यात साजरा केला दीपोत्सव ! गोड फराळ , कपडे, फटाके व दिव्यांनी उजळवला मनापुरी पाडा ;

जळगाव (प्रतिनिधी ) – येथील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी च्या सदस्यांनी अत्यंत दुर्गम भागात असलेल्या मानापुरी पाडा येथे जाऊन आदिवासी बंधू भगिनीं सोबत दिवाळी साजरी करून घराघरात दीपोत्सव उजळवून आदिवासी माता भगिनींसोबत खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद अनुभवला.
नारीशक्ती व रेड स्वस्तिकच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या घरची दिवाळी साजरी करण्यात आधी मनापुरी पाडा ता.यावल या अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या घराघरात दीप लाऊन दीपोत्सव साजरा केला.
मानवतावादी भूमिकेतून सर्व भगिनींनी स्वतः मनापुरी पाडा या दुर्गम भागात जाऊन घराघरात गोड फराळ , वाती, तेल, पणत्या, कपडे, लहान मुलांना थोडे फटाके देऊन या आदिवासी माता भगिनींसह लहान मुलांच्या चेहऱ्यावर प्रसन्न व सुखद आनंद अनुभवला.
दीपावलीचा आनंद उत्सव हा अंधारातून उजेडा कडे नेणारा जीवनाला नवी दिशा देणारा सण मानला जातो. हे आनंददायी मानवतेचं नातं जपण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांनी मानापुरी पाड्यात जाऊन आदिवासी बांधवांसोबत सोबत दिवाळी साजरी करण्याचा ह्या उपक्रमाचे मार्गदर्शन रेड स्वस्तिक सोसायटी चे महाव्यवस्थापक डॉ टी. एस. भाल व सह महाव्यवस्थापक व राज्य सचिव श्री.अशोक शिंदे, जिल्हाध्यक्ष एड. राजेश झाल्टे सौ. मनीषा ताई पाटील, डॉ.धनंजय बेंद्रे, श्री. नरेश चौधरी यांचे सह सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
या आनंददायी उपक्रमासाठी विशेष सहकार्य आर के टी चेअर्सचे मुकेश भाई, नीलिमा नायर, स्वप्नील परदेसी, आर के शर्मा, माधुरी टोके, डॉ गणेश पाटील, वंदना मंडावरे,नूतन तासखेडकर, बिरसा माहामान संघटना माहराष्ट राज्य अध्यक्ष बिरम बारेला, सदस्या उमाबाई बारेला, प्यारसिंग बारेला, प्रमसिंग बारेला, तिसऱ्या बारेला, सुनिल बारेला, दिपक बारेला, तेजस पाटील, साईनाथ पाटील,आर ई पाटील ,विद्या जकातदार,आशा मौर्य, विभावरी पाटील,किमया पाटील ,नेहा जगताप, माधुरी शिंपी, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, शोभना मकवान आदींची उपस्थिती होती