भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सखी श्रावणीं महिला बहुउद्देशिय सस्थेकडुन गोमाता सेवा केंद्रात वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर जवळील गोमाता सेवा केंद्रात दिवाळीची सुरवात वसुबारस निमित्त गाय वासराचे पुजन व औक्षण करून हिंदु वैद्यीक पध्दतीने साजरा केला .

यावेळी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भगिनींनी वसुबारस सण साजरा करून गोमाता राज्यमातेचे वासराचे औक्षण करून पूजन केले . यावेळी गोवंशाचे रक्षणकरून सेवा करावी व सेंद्रिय शेती करावी जेणेकरून येणारे उत्पन्न हे रसायन मुक्त पोष्टीक होईल असा मोलीक सल्ला उपस्थित भगिनींनी दिला
प्रसंगी सौं हेमांक्षी पाटील , सखी श्रावणींचे अध्यक्ष सौ राजश्री नेवे , शिवकन्या भाग्यश्री भिरुड सौं स्मिता माहुरकर , सौं वंदना झांबरे कु अंजली माहुरकर तसेच गोमाता रक्षक व गोंवश रक्षक उपस्थित होते गोमाता रक्षण होणे काळाची गरज आहे शहरातील गोमाता सेवा केंद्रात असंख्य गाई व नंदी हे कत्तली पासुन वाचविलेले असून मागील 19 वर्षांपासून गोसेवक रोहित महाले ही गो रक्षण सेवा कार्य करीत आहे . महाले यांचा संघर्ष व अनवाणी पायांनी घडलेला प्रवास बघता गोप्रेमी योगेश वासुदेव पाटील यांनी वाचविलेल्या गाईंना संगोपनासाठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे येथे जखमी गोमाता व इतर प्राणी देखील आहेत गोसेवेचे कार्य जितेंद्र पवार आदीत्य धायडे, कुणाल शिंदे साहिल पाटील अनिकेत पाटील रोहित महाले हे 24 तासात केंव्हाही वैद्यकीय सेवा डॉक्टर प्रदीप श्रीखंडे डॉक्टर पियुश ठोके डॉक्टर निरंजन पाटील देतात
तरी सुरु असलेल्या पावन अभियानात गोभक्तांनी पुंन्याच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी केले आहे गोमाता व मुके प्राणी यांचा वैद्यकीय इतर सर्व मदत गोभक्त योगेश वासुदेव पाटील हे करतात.


