मुंबईत दहीहंडी जल्लोषाला गालबोट ; एका गोविंदाचा मृत्यू ;

मुंबई – मानखुर्दमध्ये दहीहंडी तयारी दरम्यान ३२ वर्षीय जगमोहन चौधरी यांचा तोल गेल्याने उंचावरून पडून जागीच मृत्यू झाला. परिसरात शोककळा पसरली. मुंबईत ठिकठिकाणी दहिहंडी उत्सवात एकूण 76 गोविंदा जखमी झाले असून 43 गोविंदा उपचार करून घरी 33 गोविंदा उपचार घेत आहेत

आज गोकुळ जन्माष्टमी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. उत्साह, जल्लोष आणि एकोप्याचं प्रतीक मानला जाणारा हा सण प्रत्येक ठिकाणी मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र, या आनंदावर विरजन घालणारी एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे.

मुंबईच्या मानखुर्द परिसरात दहीहंडीची तयारी करताना एका गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला. दोरी बांधताना तोल गेल्याने गोविंदा थेट खाली कोसळला आणि जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) असं आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून उत्सवाच्या आनंदमय वातावरणात दु:खाची लाट उसळली आहे..