भुसावळात ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये कृष्णा जन्माष्टमी उत्साहात साजरी : दहिहंडी फोडून साजरा केला आनंदोत्सव ;

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृष्णा जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात येऊन दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी हे श्री कृष्णाच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी ह्या राधाच्या वेशभूषेत आले होते. इयत्ता नर्सरी ते चौथीच्या ६०० विद्यार्थ्यांनी शाळेत बांधलेली दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली.

यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट व प्रसाद देण्यात आला.प्रसंगी ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल माहिती सांगितली. या उत्सवात शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कृष्णा जन्माष्टमी निमित्त राधाकृष्णाच्या वेशभूषात आलेले विद्यार्थी.