भुसावळ डीआरएम कार्यालयात ऑनलाईन पेन्शन अदालततीचे आयोजन;

भुसावळ (प्रतिनिधी )-
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून पेन्शन अदालत जून २०२० दिनांक १५ जून २०२० सोमवार सकाळी ११ वाजता भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात ऑनलाइन आयोजित केली आहे .
पेन्शनर शी मोबाईलवर संपर्क साधून ई-मेल च्या द्वारे पेन्शन धारकांच्या तक्रारीचे शासनाच्या वर्तमान दिशा निर्देशानुसार तत्परतेने निराकरण केले जाईल.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी आपल्या तक्रारीचे अर्ज वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी भुसावळ, यांना ऑनलाइन ई मेल- bslpensionadalat2020@gmail.com वर सादर करावेत अर्जात आपले नाव, पदनाम , भरती तारीख आपल्या तक्रारीचे स्वरूप इत्यादी नमूद करावे व अर्जासोबत पासबुकची झेरॉक्स , पीपीओ ची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स स्व सत्यापित करून पीडीएफ फाईल मध्ये उपरोक्त ई-मेल वर पाठवावे.
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२० मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *