खा.रक्षा खडसेंतर्फे भुसावळातील समाज रक्षकांना ५ हजार मास्कचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना महामारीमुळे जगभरात मृत्यूचे तांडव सुरू आहे, भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात खऱ्या आयुष्यातील नायक जसे डॉक्टर, पोलीस, परिचारक, वैद्‍यकिय कर्मचारी, सफाई कर्मचारी या रणभूमीवर लढत आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असतांना आपला देश खूप चांगल्या प्रकारे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या सामन्यांमधील भुसावळ येथील समाज रक्षकांना त्यांच्या संरक्षणासाठी खा. रक्षा खडसे यांच्या तर्फे ५ हजार फेस मास्कचे वाटप करण्यात आले,
भुसावळ येथे आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे,प्रा.डॉ. सुनील नेवे यांच्या हस्ते नगरपालिका दवाखाना आरोग्य कर्मचारी व रुग्‍ण १ हजार, सफाई कर्मचारी ६०० व इतर कर्मचाऱ्यांसाठी ५०० असे एकूण २ हजार १०० फेस मास्क नगरपरिषदेच्‍या मुख्याधिकारी करूणा डहाळे व नगरपालिका रूग्‍णालयाच्‍या महिला वैद्‍यकिय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ.सुनील नेवे,मा. नगरसेवक बापू महाजन शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील,सरचिटणीस,पवन बुंदेले,डाॅ.तौसीफ खान,अमोल महाजन,गणेश कोळी,रोशन राणे, पृथ्वीराज पाटील,यशांक पाटील उपस्थित होते.
शहरातील प्रमुख दवाखाने डॉ.पंकज राणे,डॉ.रेखा पाटील, डॉ.राजेश मानवतकर, डॉ.खानापूरकर,डॉ.प्रसन्न जावळे, डॉ. तुषार पाटील,डॉ.विकास कोळंबे,रेनबो हॉस्पिटल,रिदम हॉस्पिटल येथे डॉक्टर व कर्मचारी यांना प्रत्येकी १०० फेस मास्कचे वाटप करण्यात आले.
याव्यतिरिक्त प्रांत कार्यालय १००, तहसील कार्यालय १००, शहरातील ५ ठिकाणी भरणाऱ्या भाजी बाजारातील विक्रेत्यांना म्युनिसपल हायस्कूल २००, मातृभूमी चौक २००, टीव्ही टॉवर मैदान २००, भुसावळ हायस्कुल २०० तसेच
पोलिस बांधव
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,शहर पोलीस ठाणे,बाजारपेठ पोलिस ठाणे, तालुका पोलीस ठाणे,वाहतुक शाखा येथे प्रत्येकी १०० मास्क वाटण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *