आमदार संजय सावकारेंनी दिला नाभिक समाजातील गरजुं मदतीचा हात ; 200 कुटूंबाना धान्य वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे देशात सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. या लॉक डाऊनचा फटका नाभिक समाज बांधवांना सुद्धा चांगलाच बसत आहे . सलून दुकाने बंद असल्याने त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे .अशा परिस्थितीत समाजाला सहकार्य मिळावे म्हणून भुसावळ तालुक्यातील नाभिक समाजाचे अध्यक्ष यांनी आमदार संजय सावकारे यांची भेट घेतली व सर्व परिस्थिती कथन केली असता आमदारांनी त्वरीत मदतीचा हात पुढे करून भुसावळ तालुक्यातील गरजू अशा 200 नाभिक समाज बांधवांच्या कुटुंबासाठी धान्याची व्यवस्था करून दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेला बियाणी स्कुलमध्ये काही
कुटूंबाना बोलावून सोशल डिस्टनसींग चे नियम पाळत आमदार संजय सावकारेंच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.तर उर्वरित नाभिक समाज बांधवांना घरोघरी जाऊन धान्य दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *